Thursday, 22 September 2016

पाचोरा इतिहास

पाचोरा शहराचा इतिहास 

             गाव,शहर,राज्य,देश हे केवळ खडक-माती या पुरतेच मर्यादित नसतात.या पलीकडेही प्रत्येकाचा संबंध संस्कृतीशी असतो. आणि प्रत्येक संस्कृतीला,गावाला,शहराला,राज्याला,देशाला इतिहास असतो. त्याच प्रमाणे पाचोरा शहराचा देखील एक इतिहास आहे.सुमारे ५००० वर्षापूर्वी पांडव ( युधिष्ठीर,भीम,अर्जुन,नकुल,सहदेव ) वनवासात असतांना खान्देशातील खांडववन ( पद्मालय ) येथे येवून पोहचले. त्याठीकाणी भीम – बकासुर  यांच्यात युद्ध झाले. त्यात बकासुर मारला गेला.त्यानंतर पांडव तेथून ( पद्मालयहून म्हसावद मार्गे ) पंचाळेश्वर या छोट्याशा गावात येवून पोहचले.त्यांनी तेथील नदीकाठी ( आता जेथे राम मंदिर आहे ) वास्तव्य केले.तेंव्हा त्या परिसरातील लोक पांडवांना चोर समजून घाबरू लागले.

          गावात एकच अफवा उडाली, पाच चोर आले ........ पाच चोर आले - पाचोराले........ पाचोराले  नंतर खर काय ते पाहण्यासाठी गावातील लोक त्या ठिकाणी पोहचले व सत्य परिस्थिती माहिती झाल्यावर सर्वजन पांडवांना शरण आले व त्यांची सेवा करू लागले.आणि त्यावरूनच पंचाळेश्वर  नगरीचे  पाचोरा असे नाव प्रचलित झाले. अशी आख्यायिका आहे.


No comments:

Post a Comment

Back to Top