Monday, 12 December 2016

श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव

श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव 

          मागील दोन शतकांपासून सुरु असलेल्या आणि ऐतिहासिक,सांस्कृतिक व धार्मिक वारसा जोपासणाऱ्या पाचोरा येथील श्री बलाजी महराजांचा रथोत्सव आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.हा रथोत्सव परिसरातील भाविकांचे आकर्षण ठरलेला आहे. कार्तिकी शुद्ध १४ वैकुंठ चतुर्दशीला हा रथोत्सव साजरा होतो.
          पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे पिळाजी दखनी व लासूरकर ढोके हे जनतेला त्रास देत असल्याकारणाने लोकांनी सौरक्षणाची याचना केली.तेंव्हा कोल्हापूर येथील अर्जुन पाटील यांना महाराजांनी प्रतिनिधी म्हणून तामसवाडी येथे पाठवले.त्यांनी त्याठिकाणी सलोखा घडवून आणला.तेंव्हा मुलकी व पाटीलकी अशा दोन पदव्या लागू करण्यात आल्या.यातील अर्जुन पाटील यांचे वंशज रामा पाटील व त्यांचे पाचही भाऊ १७६२ च्या सुमारास पाचोरा येथे आले.व त्यांनी आपल्या परिश्रमाने येथे आपळे स्थान निर्माण केले.रामा पाटील यांचे भाऊ शामा पाटील हे पंढरपूरची नित्य पाई वारी करत ,त्यांना पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत पाणी पीत असतांना बालाजी महाराजांची मूर्ती हाती लागली.ती मूर्ती त्यांनी पाचोरा येथे आणली. शामा पाटील यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी आपल्या मालमत्तेतून १९४२ च्या सुमारास गांधी चौकात बालाजी मंदिर उभारले व रथ ही तयार केला.तेंव्हा पासून हा रथोत्सव अखंडित सुरु आहे. ३० फुट उंच असलेल्या या रथावर आकर्षक कोरीवकाम असून त्यावरील राक्षस व चौकीदारांच्या मूर्ती अति प्राचीन आहेत.सयाजी परिवाराच्या मालकीचा हा रथ असल्याने व सयाजी परिवार मुळचा कोल्हापूरचा असल्याने कोल्हापुरकरांचा रथ असेही नाव प्रचलित आहे.
          रथाची पूजा करण्याचा मान सयाजी परिवारातील नवीन जोडप्यास दिला जातो.मोहन जोशी व त्यांचे वारस धार्मिक विधी करतात.व चौकदाराचा मान राघो गणपत पाटील यांच्या घराण्यात असून त्यांचे नातू गिरीश पाटील पारंपारिक वेश्यात  चौकदाराचा मान पार पडतात.रथाला मोगरी लावण्याची कामगिरी फकीरा वाडेकर,सुभाष मिस्तरी हे पार पडतात.            


No comments:

Post a Comment

Back to Top