Monday, 12 December 2016

श्री चक्रधर स्वामी मंदिर

श्री चक्रधर स्वामी मंदिर 

          पाचोरा येथे हिवरा नदीच्या तीरावर मानसिंगका इमारतीच्या मागील बाजूस श्री चक्रधर स्वामी मंदिर आहे.या मंदिराला गेल्या ९०० वर्षाचा इतिहास असून अवतार पुरुष श्री चक्रधर स्वामींनी या मंदिरात काही काळ वास्तव्य केल्याचे पुरावे आहेत.एवढेच नव्हे तर चक्रधर स्वामींनी ९०० वर्षापूर्वी पाचोरा शहराचे नाव पचोरी असे ठेवले असल्याचेही भाविक सांगतात.          महानुभाव पंथाच्या लीलाचरित्र या ग्रंथात चक्रधर स्वामी यांनी पाचोरी या गावाचा उल्लेख केलेला आढळतो.धार्मिक परंपरा जोपासणाऱ्या या मंदिरात भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव उत्साहाने साजरा होतो.परिसरातील तसेच दिल्ली,जम्मू-काश्मीर,मुंबई,मद्रास,कलकत्ता या भागातूनहि अनेक महानुभाव पंथीय येथे दर्शन व धार्मिक विधीसाठी येत असतात.


No comments:

Post a Comment

Back to Top